जळगाव- कामगारकल्याण मंडळाच्या जळगाव कार्यालयातर्फे सोमवारी रोटरी हॉलमध्ये लोकनृत्य स्पर्धा झाली. त्यात मराठी पारंपरिक गीतांसोबत लोकनृत्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले. या वेळी मुलांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांनाही थिरकायला लावले.
स्पर्धेत जोशी कॉलनी केंद्राला प्रथम (वाघ्या-मुरळी), ललित कलाभवनाला द्वितीय (भवानी नृत्य) पिंप्राळा केंद्राला तृतीय (लेझीम) पारिताेषिक मिळाले.
वाद्यांचीसाथसंगत : यावेळी विविध नृत्यप्रकारांचे लाइव्ह सादरीकरण केले. वाद्यांच्या तालावर स्पर्धकांनी ठेका धरला होता. पावरा नृत्यात वाद्यांच्या तालावर विविध नृत्यप्रकारांची अॅक्शन दाखवण्यात अाली. या स्पर्धेत जिल्हाभरातील संघांनी सहभाग नोंदवला. बक्षीस वितरणावेळी अध्यक्षस्थानी संजय पत्की होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरी जोशी होत्या. परीक्षण संजय पवार, रमेश साठे रमाकांत भालेराव यांनी केले. प्रास्ताविक मनोज पाटील सूत्रसंचालन अजय निकम यांनी केले.
लोकनृत्यांची झलक, लेझीमचे सादरीकरण
चाळीसगावच्यानेहरू चौक केंद्राने धनगर नृत्य सादर केले. पाचोरा केंद्रातर्फे ‘आई गोंधळाला ये’ या गाण्यावर 'गोंधळ दोंडाईचा' केंद्रातर्फे ‘खंडोबाचे लगीन’ गाण्यावर वाघ्या-मुरळी, नारायणवाडी केंद्रातर्फे ‘चांदणं चांदणं झाली रात’ गाण्यावर कोळीनृत्य, दीपनगरतर्फे आदिवासी ‘पावरा’नृत्य, नंदुरबार केंद्रातर्फे दांडिया या गुजराती लाेकनृत्य गरब्याचा प्रकार, जोशी कॉलनी (जळगाव) केंद्रातर्फे ‘खंडोबाचा लगीन सोहळा वाघ्या-मुरळी’, ललित कला केंद्रातर्फे ‘भवानी’ नृत्य तर पिंप्राळा केंद्रातर्फे लेझीम नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.