आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार, नोकरदार, उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सुसह्य गृहप्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-  स्मार्ट सिटी नाशिक फ्युचर डेस्टिनेशन एक्स्पो अंतर्गत नाशिक शहरातील विविध ग्रुपच्या गृहप्रकल्पांमध्ये अगदी कंपनीतील कामगार, नोकरदारांसह उद्योजकांनाही सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्लॉटस, फ्लॅट्स, शॉप्ससह शोरूममध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा एक्स्पो १५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. 
 
सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा आनंद 
सम्राट ग्रुपच्या नाशिकमध्ये टू थ्री बीएचके रो हाऊस असलेल्या ड्रीम व्हिला, ड्रीम सिटी ड्रीम नेस्ट या टाऊनशिप पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर सम्राट गोकुळधाम, सम्राट वृंदावन, सम्राट ट्रॉपिकानो, सम्राट सिंफनी हे सुद्धा टू, थ्री फोर बीएचके असलेले गृहप्रकल्प आहेत. सम्राट न्यूक्लिअसमध्ये रहिवासासह शोरूम ऑफिसेसची सुविधा आहे. या प्रकल्पांमध्ये क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, मल्टिपर्पज लॉन, सीनियर सिटिजन लाॅन आदी सुविधा आहेत. ट्रॉपिकानोमध्ये लाख स्क्वेअर फूट पोडियम लेवल गार्डन आहे. आर्टिफिशियल बीचही तयार करण्यात आला आहे. सिग्नेचर बाय सम्राट या प्रकल्पामध्ये स्काय व्हिला वन फ्लोअर, वन प्लॅटची सुविधा आहे. या प्रकल्पामध्ये सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा आनंद घेता येणार आहे. 
 
कामगारांंच्‍या घराचे स्‍वप्‍न पूर्ण होणार
नाशिकच्या श्री राजश्री कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चा अंबडगाव येथे श्रीहरी हा गृहप्रकल्प आहे. येथे सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात वन बीएचके, टू बीएचके आणि वन रूम किचन उपलब्ध आहेत. अगदी १० लाखांपासून ते २५ लाख रुपयांपर्यंत ‘बजेट हाेम’ उपलब्ध आहेत. पाळणाघर, चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी सेंटर, गार्बेज डक्ट, पोडियम गार्डन, गेस्ट हाऊस, कम्युनिटी हॉल अशा सर्व सोयींनी युक्त हा प्रकल्प आहे. चिंचोली शिवारातील श्रीस्वरूप हा गृहप्रकल्प खास कामगार वर्गाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे. अगदी ४४० स्क्वेअर फुटाचा वन बीएचके फ्लॅट ८.५० लाखात असून कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. 

सूर्या प्रॉपर्टीजचे एन.ए. झालेले प्लॉट 
सूर्या प्रॉपर्टिजचे पंचवटीपासून किलाेमीटर अंतरावरील मखमलाबाद येथे एन.ए. झालेले रहिवासी व्यापारी प्लॉट्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नाशिक विमानतळालगत असलेल्या ओझर शिवारातही प्लॉट्स विक्रीस उपलब्ध आहेत. संरक्षण भिंती, वृक्षारोपण, पथदिवे, बोअरवेल आदी सुविधा करून देण्यात आल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत सूर्या प्रॉपर्टीजने ४५०० प्लॉटची विक्री केली आहे. बाजारभावाच्या ७० टक्के कर्ज प्लॉट खरेदीवर उपलब्ध आहे. 

नाशिकच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांजवळ संधी 
नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, प्रमोद महाजन गार्डन, मेडिकल कॉलेज या महत्त्वपूर्ण ठिकाणाजवळ राजश्री डेव्हलपर्सचा राजश्री ओयस्टर हा प्रकल्प मेरिलिंक रोड, अडगाव येथे आहे. वन बीएचके, टू बीएचके फ्लॅट्स या प्रकल्पात उपलब्ध आहेत. डेकोरेटिव्ह इंट्रन्स लॉबी, आकर्षक गेट, अॅडजॉयनिंग गार्डन, लायब्ररी, सुरक्षा आदी सुविधायुक्त आहे. 
बातम्या आणखी आहेत...