आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर कार्यशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रोटरीक्लब ईस्टतर्फे ‘डिजिटल इंडिया वीक’ अभियानांतर्गत सोशल मीडियाबाबत कार्यशाळा घेण्यात आली. तन्वी मल्हारा हिने ‘बी फ्रेंडस् विथ सोशल मीडिया’ या विषयावर माहिती दिली. यात तन्वीने फेसबुक, टि्वटर या सारख्या माध्यमांचा व्यवसायासाठी, व्यापारासाठी कसा उपयोग होऊ शकतो, याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडियाचे आजच्या काळातील महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात तन्वी मल्हारा यांनी साेशल मीडियाचा आपणास वैयक्तिक व्यावसायिक जीवनमान उंचावण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:ची प्रोफाइल केवळ देशापर्यंतच मर्यादित राहता. तिला जागतिक प्रसिद्धी कशी मिळवू शकू याबाबतचे फंडे सांगितले. तर व्यवसायाबाबतचे ब्लॉग, वेब पेज, फेसबुक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसा प्रसार करता येईल, याची माहिती सोदाहरण दिली.

रोटरीच्या सदस्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष संजय गांधी, सचिव डॉ. राहुल भंसाली, डॉ. नंदन माहेश्वरी, डॉ. श्रीधर पाटील, वर्धमान भंडारी, राजेश जवाहरानी, विवेक धांडे, निखिल जैन, चिराग अलावत रोटरी क्लब ईस्टरचे सदस्य उपस्थित होते.