आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या 12 दिवसांपासून पावसाने फिरवली पाठ, पीक स्थिती विदारक; शेतकऱ्यांची चिंता वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरासह तालुक्यात गेल्या १२ दिवसांपासून एक मिमी देखील पाऊस झालेला नाही. ऐन श्रावणात उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांची स्थिती विदारक झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 
 
भुसावळ शहरात ३१ जुलैला १.४० मिमी तर तालुक्यात एकूण ७.४० मिमी पाऊस झाला होता. या अत्यल्प पावसानंतर तालुक्यात कुठेही पावसाची नोंद नाही. तब्बल १२ दिवस उलटून देखील एक मिली देखील पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सून अत्यंत कमकुवत आहे. ऑगस्टचे १२ दिवस उलटूनही पाऊस नाही.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होता. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या दोन्ही महिन्यात शहरासह विभागात केवळ रिपरिप पावसाने हजेरी दिली. 

मात्र ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले होते. आता ऑगस्टचे १२ दिवस उलटूनही तालुक्यात एक मिमीदेखील पाऊस नसल्याची स्थिती आहे. पावसाअभावी कापसाची उंची खुंटल्याने तसेच उडीद आणि मूग पिकाच्या ऐन शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. आगामी दोन दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पिकांची स्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे भिडल्या आहेत. 
 
सरासरी ३८.५ टक्के 
भुसावळ तालुक्यात ऑगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३८.५ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची सरासरी ६० ते ७० टक्के पर्जन्य होते. यंदा संपूर्ण पावसाळ्यातही ७० टक्क्यांपर्यंत सरासरी गाठली जाईल किंवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 
बातम्या आणखी आहेत...