आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल मातीच्या गंधात रंगणार कुस्तीचा सराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील मल्लांना अस्सल लाल मातीच्या गंधात कुस्तीचा सराव करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे सात लाख रुपये खर्चाच्या आखाड्याचे काम सुरू झाले आहे. एकाच वेळी चार मल्लांच्या जोड्यांना या आखाड्यात सराव करता येणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुलाची २००७मध्ये निर्मिती झाली. सध्या ३० ते ३५ मल्ल खेळाडू क्रीडा संकुलात नियमित सराव करतात. मात्र, क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सुविधेबरोबरच कुस्तीसाठी ‘आखाडा’ नसल्याने मल्लांना सरावासाठी अडचणी येत होत्या. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातर्फे २०१०मध्ये आखाड्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला लगेच मंजुरी मिळाली. परंतु निधी मिळाल्याने काम रखडले होते. आता या आखाड्याच्या कामासाठी लाख ८४ हजारांचा निधी मंजूर होऊन मिळाला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात आखाडा बांधण्याचे काम सुरू झाले आहे.

असा असेल आखाडा

क्रीडासंकुलातील लॉन टेनिस मैदानाच्या बाजूला आखाडा तयार करण्यात येत आहे. त्याचा आकार १७ बाय २३ फुटांचा आहे. या आखाड्यासाठी लाल माती टाकण्यात येणार आहे. ही माती टाकताना त्यात हळद, कापूर, तेल. गुलाबजल आदींचे मिश्रण करून भुसभुशीत करण्यात येणार आहे. या आखाड्यात चार मल्लांच्या जोड्या म्हणजे आठ खेळाडू एकाचवेळी सराव करू शकतील एवढी क्षमता आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात तयार करण्यात येत असलेला आखाडा.
आखाड्याचे लवकरच होईल काम पूर्ण
क्रीडासंकुलात कुस्तीच्या आखाड्याचे काम सुरू झाले आहे. मल्लांना सरावासाठी त्याचा निश्चित फायदा होईल. लवकरच या आखाड्याचे काम पूर्ण करण्याचे अामचे नियोजन आहे. सुनंदापाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी

जिल्ह्यातीलखेळाडूंना स्पर्धेत निश्चित फायदा
कुस्तीसाठीआखाडा ही आपली परंपरा आहे. परंतु क्रीडा संकुलात आखाडा नसल्याने स्पर्धेच्या सरावासाठी खेळाडूंना मॅटवरच सराव करावा लागत होता. आखाड्यात सराव केल्यास त्याचा स्पर्धेत निश्चित फायदा होतो. जगदीशचौधरी, कुस्ती प्रशिक्षक, क्रीडा संकुल