आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात उलटा ध्वज फडकवला; पालिका कर्मचारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ध्वज उलटा फडकवण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार सकाळी 11 वाजेच्या सुमारास काही कर्मचार्‍याच्या निदर्शनास आला. आयुक्तांना यासंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर ध्वज उतरवण्यात येऊन पुन्हा व्यवस्थित फडकवण्यात आला. या प्रकरणी संबंधित कर्मचार्‍यास निलंबित करण्यात आले आहे.

पालिकेच्या प्रांगणात सकाळी 7 वाजता ध्वज फडकवण्यात येतो व सायंकाळी काढून घेण्यात येतो. सोमवारी सकाळी गोविंद महागडे या कर्मचार्‍याने ध्वजारोहण केले होते. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी 10 वाजेनंतर पालिकेत येण्यास सुरुवात झाल्यावर ध्वज उलटा फडकवण्यात आल्याची बाब काहींच्या निदर्शनास आली. याप्रकरणी आयुक्त संजय कापडणीस यांच्यापर्यंत विषय गेल्याने त्यानी व्यवस्थित ध्वजारोहण केले. या प्रकरणी संबंधित कर्मचार्‍यास निलंबित करण्यात आले आहे.