आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या उपचाराने तरुण दगावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमेश संजय कढोरे - Divya Marathi
प्रथमेश संजय कढोरे
जळगाव- जिल्हा रुग्णालयात चुकीच्या औषधोपचारामुळे १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा अाराेप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली. प्रथमेश संजय कढोरे (वय १८, हरिविठ्ठलनगर) असे या तरूणाचे नाव आहे.
घटनेनंतर रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केला चुकीच्या इंजेक्शनमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. या वेळी शंभरावर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा इशारा दिला हाेता. वातावरण तणावग्रस्त झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
हातपाय दुखत असल्याने प्रथमेशला दुपारी १२.३० वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यास नंबरच्या अपघात कक्षात दाखल केले. दुपारी उपचारावेळी प्रथमेश यास शंकर बालाजी इंद्राळे यांनी इंजेक्शन दिले. त्यानंतर १० मिनिटात प्रथमेश यास रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यास अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ५.३० वाजता डॉक्टरांनी प्रथमेश मृत झाल्याचे घोषित केले. दुपारपर्यंत केवळ हातपाय दुखून थंडी वाजत असल्याने त्यास उपचारासाठी दाखल केले होते. त्या वेळी त्याला ताप नव्हता. तो चांगल्या स्थितीत होता. मात्र, दुपारी दिलेल्या इंजेक्शनमुळेच त्याची प्रकृती खालावली रक्ताची उलटी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला अाहे.

अल्सरची जखम फुटल्याने रक्तस्त्राव
पोटातअल्सरची जखम फुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान रुग्णाने बुफेन नावाच्या गोळ्या घेतल्याने त्याची प्रकृती खालावली असावी. प्रथमेशवर पूर्णपणे योग्य उपचार केला गेला आहे. चुकीचा उपचार झाला असेल तर शवविच्छेदन झाल्यावर सत्य काय ते समोर येईल. डॉ.किरण पाटील, प्रभारीजिल्हा शल्यचिकित्सक
प्रथमेश कढोरे