आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘यशदा’ प्रशिक्षणावर पालिकेत बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या कर्मचार्‍यांना माहिती अधिकारासंदर्भात येणार्‍या अडचणी उद्भवू नये, यासाठी यशदातर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी उद्घाटनासाठी ऐनवेळी आमंत्रण दिल्याने महापौर, उपमहापौरांसह पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे उपायुक्तांनाच अध्यक्ष व पाहुणे म्हणून बसवण्याची वेळ आयोजकांवर आली.
यशदा तसेच जळगाव महापालिका प्रशासनातर्फे पालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती अधिकार कायदा व त्यातील समस्यांसंदर्भात सोमवार ते शनिवार दर दिवसाला सुमारे 60 कर्मचार्‍यांना एक-एक दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कार्यक्रम सुरू होण्याच्या काहीवेळ आधी महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. मात्र ऐनवेळी दिलेल्या या आमंत्रणावर कार्यक्रमास न येण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी घेतला.
त्यामुळे उद्घाटक म्हणून उपायुक्त प्रदीप जगताप यांना तर अध्यक्ष म्हणून उपायुक्त अविनाश गांगोडे यांना बसविण्याची वेळ आयोजकांवर आली. यशदाचे व्याख्याते नितीन सोनवणे, अभया शेलार, समन्वयक दत्तात्रय रोकडे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
उशिरा मिळाले आमंत्रण
पालिकेचा नियोजित कार्यक्रम असतानाही आम्हाला वेळेआधी निमंत्रण दिले गेले नव्हते. दिवसभरात आम्ही आमच्या नियोजित कामात असताना माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 15-20 मिनिटे अगोदर प्रशासनाने कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, ही बाब योग्य नाही. सुनील महाजन, उपमहापौर