आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलतानीचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ट्रकचे सुटे भाग चोरल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या यासीन मुलतानीची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असली तरी, बुधवारी आणखी एका वेगळ्या गुन्ह्यात त्याला अटक करून पोलिस कोठडीची मागणी करणार आहे.
22 फेब्रुवारीला एमआयडीसीत एका शेतात युनूस देशमुख नावाचा युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे मेहरूणमध्ये तणाव निर्माण झाला होता. या गुन्हय़ातही मुलतानी संशयित आरोपी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बुधवारी त्याला या गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.