आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलचे जिनिंग प्रेसिंग युनिट पुन्हा होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तीन वर्षांपासून बंदावस्थेत असलेले तालुका खरेदी-विक्री संघाचे जिनिंग प्रेसिंग युनिट यंदा सुरू होण्याची चिन्हे आहेत. तीन वर्षांपूर्वी खरेदी-विक्री संघाने सुमारे दीड कोटी खचरून हे युनिट सुरू केले होते.

युनिट सुरू झाले त्याच वर्षी मंदीचे सावट आल्याने हे युनिट भाडे तत्त्वावर चालवण्यास कुणीही तयारी दर्शवली नाही. काही दिवसांपूर्वी सेंधवा व अंजनगावसुर्जी (जि.अमरावती) येथील व्यापार्‍यांनी युनिटची पाहणी केली होती. त्यामुळे युनिट पुन्हा भाडेतत्त्वावर सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती व्यवस्थापक एस. के. गाजरे यांनी ‘दिव्य मराठी’ ला दिली.

युनिट सुरू झाल्यास खरेदी-विक्री संघाच्या उत्पन्नात वाढ होऊन कर्जफेड करण्यास मदत मिळणार आहे. तसेच या माध्यमातून तालुक्यातील 100 कामगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे.सुमारे 10 लाख रुपये वार्षिक भाडे या युनिटच्या माध्यमातून संघाला मिळेल, अशी अपेक्षा आहे. तीन वर्षांपूर्वी याचं युनिटच्या उभारणीसाठी स्टेट बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, वेळेत कर्जाची परतफेड न झाल्याने जून महिन्यात ‘सेक्युरिटायझेशन अँक्ट’ नुसार खरेदी-विक्री संघाच्या जमिनीवर बँकेने ताबा घेतला. ही समस्या आता निकाली निघणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध होईल.