आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yaval Taluka Incident : Widow Walking To Bank For Money But Not Lilfe

यावल तालु‍क्यातील घटना : बॅँकेतील रकमेसाठी विधवेची परवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ/यावल - मृत पतीच्या बँक खात्यातील शिल्लक पाच हजार 600 रुपये मिळवण्यासाठी किनगाव (ता.यावल) येथील विधवा महिलेला किनगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आर.जी.पाटील यांच्या कार्यक्षेत्रातच विधवेला हक्काच्या पैशांसाठी निष्ठुर प्रशासनाशी झगडावे लागत आहे.

कमलबाई रामदास वराडे (वय 62, रा.किनगाव) यांचे पती रामदास चिंधू वराडे यांनी गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बचत खाते उघडले होते. 25 डिसेंबर 2012 ला त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या खात्यात 5600 रुपये शिल्लक होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम मिळावी, यासाठी कमलबाईंनी बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. शाखा व्यवस्थापक संजय बागल यांची भेट घेतली. कागदपत्रे दिल्यास दोन दिवसांत पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांनी कमलबाई बँकेत गेल्यावर कर्मचार्‍यांनी त्यांच्याशी अरेरावी केली. याबाबत बँक संचालकांसह, जिल्हाधिकारी आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे.
कागदपत्रांची पूर्तता
बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. सर्व वारसांना बॅँकेत बोलावले, गावच्या सरपंचांनी ओळख दिली. तरीही बँकेने दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराची तक्रार केली. कमलबाई वराडे, तक्रारदार महिला