आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yawal Bas Itransport To Thane For Ganesh Festival

यावलच्या १२ बसेस ठाण्याला रवाना, अनंत चतुर्दशीनंतर परतणार बसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - येथीलआगाराच्या १२ बसेस संबंधित चालक-वाहकांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर आगारात सोमवारी रवाना झाल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाच्या शहापूर आगारातून कल्याण भिवंडीमार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या तुलनेत स्थानिक बसेसची संख्या कमी असल्याने यावलहून या बसेस रवाना करण्यात आल्या. या बसेस अनंत चतुर्दशीनंतर यावलला परतणार आहेत.
यावल आगारातील १२ बसेस शहापूर आगारात रवाना झाल्याने तालुक्यातील बसफेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कमी उत्पन्नाच्या काही फेऱ्या रद्द होणार आहेत. तसेच काही लांब पल्ल्याच्या फेऱ्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने इतर आगारांकडून मदत घेतली जाते. त्यानुसार यावल आगाराच्या १२ बसेस सोमवारी रवाना झाल्या आहेत. यावल आगारातून दररोज ७४ बसेसद्वारे सेवा पुरवली जाते. मात्र, १२ बसेस रवाना झाल्याने उर्वरित ६२ बसेसच्या आधारे नियमित फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तीन स्थानिक पातळीवरील काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, याकडे लक्ष पुरवले जात आहे.
विद्यार्थ्यांची काळजी
आगारातील १२ बसेस शहापूर आगारात पाठवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. इतर कमी उत्पन्नाच्या फेऱ्या मात्र रद्द केल्या जातील. डी.एम.वाणी,आगारव्यवस्थापक, यावल डेपो