आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल नगरपालिकेच्या सभागृहात जेवणाच्या पंगती; काही नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- येथील नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेचा थेट जेवणाच्या पंगती करता वापर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नगरसेवकांच्या एका गटाने तीव्र संताप व्यक्त करत उपस्थित अधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
 
रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी यापूर्वी यावल पालिकेत कामकाज पाहिल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्नेहभोजन आयोजित केले होते. सभागृहातील नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेचा यासाठी वापर करण्यात आला. त्यावरून नगरसेवकांच्या एका गटाने तीव्र संताप व्यक्त केला. या गटाने गुरूवारी नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी राजेश कानडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की, यावल पालिकेने गेल्या वर्षी वैशिष्ठयपूर्ण निधीतून 18 लाख रुपये खर्च करून सभागृह शहर विकासाच्या चर्चासाठी वातानुकुलित व आधुनिक केले आहे. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, सेवानिवृत्त मुख्याधिकारी  पी. जी. सोनवणे, फैजपुरचे मुख्याधिकारी उगले, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, त्यांचे पती शरद कोळी, व काही नगरसेवकांनी सभागृहातील नगरसेवकांच्या खुर्च्याचा व टेंबल्सचा जेवणासाठी वापर करून सभागृहाचा गैरवापर केल्याप्रकरणी नगराध्यक्षा कोळी व नगरसेवक यांना अपात्र करावे तसेच मुख्याधिकारी आढाव यांना निलंबित करावे. निवेदनावर नगरसेवक अतुल पाटील, गटनेते राकेश फेगडे, नगरसेविका रुख्माबाई महाजन, देवयानी महाजन, नौशादबी तडवी, डॉ. कुदन फेगडे यासह नागरिकांच्या सह्या आहेत. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही तर कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र देवरे यांनी यासाठी नगराध्यक्षांनी परवानगी दिली होती, असे सांगितले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो
 

बातम्या आणखी आहेत...