आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, सानिया कादरीला जखमा झाल्या होत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -भुसावळात गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिस बंदोबस्तात सानिया कादरीसह तिच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्या वेळी सानियाची वैद्यकीय तपासणी करताना तिच्या खांद्याला दुखापत झाली होती व तिला त्रास होत असल्याचे आढळून आले होते. अशी साक्ष जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी नोंदवली. सरकारी वकील अँड. गोपाळ जळमकर यांनी त्यांची साक्ष नोंदवून घेतली. गुरुवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.सुराणा यांचे समोर सानिया गोळीबार प्रकरणाची सुनावणी झाली.

बळीरामपेठेत चोरी
बळीरामपेठेतील सचिन अपार्टमेंटमधील तुलसी टेक्स या साड्या विक्रीच्या दुकानातून चोरट्यांनी 49 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. राकेश मदनलाल दारा यांच्या मालकीच्या या दुकानाच्या पुढील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या साड्या तसेच 22 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दारा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.