आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yet Prince Charls Remain Mumbai's Dabba On Their

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिन्स चार्ल्सने कोहिनूरप्रमाणे जपलाय मुंबईचा डबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मुंबईच्या फुटपाथवर प्रिन्स चार्ल्स यांनी अलीकडेच आमची भेट घेतली आहे. जेवणाचे डबे वाहतुकीच्या व्यवस्थापनाची माहिती त्यांनी जाणून घेतली होती. एक आठवण म्हणून आम्ही त्यांना गांधी टोपी अन् एक डबा भेट दिला होता. त्यांनी या दोन्ही वस्तू त्यांच्याकडे कोहिनूर हिरा जेथे ठेवला आहे, त्याच्या शेजारीच ठेवल्या आहेत, असे गुपित मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सरचिटणीस गंगाराम तळेकर यांनी येथे उलगडले.

भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयात त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, जेवण डबे वाहतुकीचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी देशभरातील विद्यापीठांचे अभ्यासक वाहतूक मंडळाला भेट देतात. इटली, इंग्लंड, जर्मनी, नायजेरिया अशा देशांमध्ये जाण्याचा योग आला आहे. ‘मुंबईचा डबेवाला’ पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रकाशन संस्थेने दिवंगत विलासराव देशमुखांना बोलावले होते. ‘साहेब, तुम्ही वेळेवर यावे, नाही तर डबेवाले वेळ झाला की चालले जातील’ असा निरोप आयोजकांनी विलासरावांना दिला होता. त्यामुळे ते एक मिनिट अगोदर पोहोचले होते. त्या वेळी भाषणात ते म्हणाले होते की, ‘आजपर्यंत मी कोणत्याच कार्यक्रमाला वेळेवर गेलो नाही. पण; डबेवाल्यांचा कार्यक्रम असल्याने वेळेचे बंधन पाळावेच लागले.’

गंगाराम तळेकरांनी सांगितले डबेवाल्यांची अनेक गुपिते
* वारक-यांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूर, जेजुरी, आळंदी, भीमाशंकर अशा चारही ठिकाणी समाजाचं आपण काही देणं लागतो म्हणून सेवासुविधायुक्त धर्मशाळा उभारल्या जात आहेत. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचा हा प्रकल्प निश्चित पथदर्शी ठरल्याशिवाय राहणार नाही.
* जेवणाचे डबे वाहतूक करणा-यांपैकी कोणीही नशा केलेले आढळल्यास त्याला एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
* टोपी, ओळखपत्र गळ्यात नसले तर 50 रुपये दंड आकारणी केली जाते.
* मंडळाची स्थापना 1890 मध्ये झाली आहे. मात्र, अधिकृत नोंदणी 1956 मध्ये करण्यात आली आहे. 5 हजार लोक 2 लाख डबे दररोज पोहोचवतात.
* डबे वाहतूक करणा-या प्रत्येकाला 6 ते 7 हजार रुपये पगार दिला जातो. दिवाळी बोनस हा ग्राहकाकडूनच मिळतो. एका डब्यासाठी महिन्याला 350 ते 400 रुपये आकारले जाते.

बिपाशा बसूला मोह
प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर यांच्या विवाहालाही जाण्याचा योग आला. मंडळातर्फे त्यांना पुणेरी फेटा, कोल्हापुरी चप्पल, साडी-चोळीचा आहेर दिला होता. चित्रपट अभिनेत्री बिपाशा बसूलाही आमच्या डबेवाल्यांच्या सायकलीवर बसण्याचा मोह आवरता आला नव्हता, असे गंगाराम तळेकरांनी सांगितले.