आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून योगाचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाढती स्पर्धा आणि अभ्यासाच्या ताणतणावातून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी आता त्यांना योगा शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढाकार घेतला असून इयत्ता सहावी ते बारावीदरम्यानच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून योगाचे धडे दिले जाणार आहेत.

विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी, त्यात स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची चढाओढ आणि आपला पाल्य या स्पध्रेत यशस्वी व्हावा यासाठी पालकांचा दबाव असतो. या सर्व वातावरणात मुलांना सक्षम बनवणे आणि सकारात्मक दृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने योगा कोर्स सुरू करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्या संबंधीची सूचनाही संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

योगा कोर्ससाठी खास क्रीडाशिक्षकांप्रमाणेच योगा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. योगाचा अभ्यासक्रमही संकेतस्थळावर टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही याविषयी माहिती मिळणे शक्य होणार आहे.

असा असेल वर्गनिहाय अभ्यासक्रम
सहावी : योगाचे प्राथमिक ज्ञान, व्यायाम, आसने
सातवी : योगाचे प्रकार, आसने, प्रार्थना
आठवी : मानववंशशास्त्र आणि शरीर रचनाशास्त्र
नववी : मानवी जीवन आणि योगाचा संबंध, अष्टांग योगाचे महत्त्व
दहावी : प्राणायाम आणि ध्यान
अकरावी : योगाची भूमिका, चक्र
बारावी : योगाचे परिणाम, प्राणायाम आणि मानवी शरीर आदी