आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच लोकशाहीला तारक, योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- देशात जाती व्यवस्थेवरील समीकरणे अद्यापही कायम आहेत. त्यामुळे लोकशाही अधोगतीकडे जाण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार लोकशाहीला तारक ठरतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केले.

शिवराय विचार मंचतर्फे रविवारी कांताई सभागृहात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाही’ या विषयावर योगेंद्र यादव यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ.ए.जी.भंगाळे होते. यादव म्हणाले, देशातील राष्ट्रपुरुषांची केवळ जयंतीलाच आठवण काढली जाते. त्यानंतर त्यांचे महत्त्व हे फोटोपुरता मर्यादित राहते. या राष्ट्रपुरुषांच्या विचारांनीच हा देश लोकशाही घडवली. मात्र, सद्य:स्थितीत या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत दलितीकरण, दैवीकरण दारिद्रीकरण या तिघांपासून धोका आहे. डॉ.आंबेडकर केवळ एका जातीचे, धर्माचे नव्हते, हे विचारात घेतले जात नाही. आज त्यांचे विचार आपण विसरत चाललो आहोत. त्यांच्या विचारांच्या निखाऱ्यावर युवकांनी फुंकर घालून ते पुन्हा समाजासमोर आणण्याची गरज आहे. या वेळी व्यासपीठावर महापौर नितीन लढ्ढा, प्रतिभा शिंदे, कवी अशोक कोतवाल, डॉ.मिलिंद बागुल, अयाज अली, मुकुंद सपकाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.अस्मिता पाटील उपस्थित होते.

आधुनिकता समजून घ्या
हिंदूसमाज शास्त्र परंपरेची नाते कसे बनवले पाहिजे? तसेच आधुनिकतेबाबत आपण काय विचार करतो? यासह याविषयीचे डॉ.आंबेडकरांचे विचार, याबाबतही त्यांनी माहिती दिली. लोकशाही केवळ औपचारिकतेचे नाव नसून लोकशाही म्हणजे, समाजाचे लोकतांत्रिकरण, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य विचारांचा सन्मान होय. २० व्या शतकात लोकशाहीचा पहिला सिद्धांत डॉ.आंबेडकरांनी मांडला, तीच लोकशाही देशाला तारक ठरू शकेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिभा शिंदे यांनी केले. हर्षल पाटील यांनी आभार मानले.
शिवराय विचार मंचतर्फे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाही’ विषयावर अायाेजित व्याख्यानात बाेलताना याेगेंद्र यादव. व्यासपीठावर डाॅ.मिलिंद बागुल, मुकुंद सपकाळे, महापाैर नितीन लढ्ढा, डॉ.ए.जी.भंगाळे, प्रतिभा शिंदे अादी.

जन्माच्या आधारावर ओळख
जातही एक वर्तमानातील खरे सत्य आहे. जाती व्यवस्थाही आजचे कटू सत्य अाहे. जातीच्या विचारांमुळे आजचा समाज सडत अाहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत असूून आर्थिक व्यवस्थाही कोलमडते आहे. आजही समाजात जन्माच्या आधारावर ओळख निर्माण होते. जातीच्या आधारावर गुणवत्तेचे निकष लावले जातात. जाती व्यवस्थेचे निर्मूलन शक्य अाहे. यासाठी डॉ.आंबेडकरांचे विचार, नवी भाषा सिद्धांत कायम राखणे आवश्यक अाहे, असेही यादव म्हणाले.

राजकीय पक्षांची उदासीनता
जातविषमतेचे संबंध कशा प्रकारे निर्माण केला जातात, हे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. जात, श्रीमंती, गरिबी, लिंग भेद गाव- शहर या प्रकारातून विषमतेला थारा दिला जात आहे. यात काही निवडक जातींचा स्वार्थ वाढला अाहे. समाजातील सर्व प्रकारच्या विषमतेला नष्ट करणे, हे डॉ.आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र, आज विषमतेचा संघर्ष वेगळ्या दिशेला जात असल्याची स्थिती अाहे. दलित आदिवासींना जोडण्यासाठी एकही राजकीय पक्ष पुढे येत नाही.
ज्येष्ठ विश्लेषक योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन