आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भादली येथील तरुण शेतकऱ्याची अात्महत्या, जमीन विकूनही कर्जाचा डाेंगर होता कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्र नारायण जावळे - Divya Marathi
जितेंद्र नारायण जावळे
जळगाव- शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी तब्बल वेळा केलेली ट्युबवेल फेल गेली. ट्युबवेलमुळे डाेक्यावरचे कर्ज फेडण्यासाठी शेतीच विकण्याची वेळ अाली अाहे. उदरनिर्वाहासाठी साधन नसताना डाेक्यावर कर्ज असल्याने भादली येथील जितेंद्र नारायण जावळे या तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे घरात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. 

जळगावापासून जवळच असलेल्या भादली बुद्रूक या गावात रहिवासी असलेल्या जितेंद्र जावळे (वय ४४) या तरुण शेतकऱ्यांची ४० गुंठे शेतजमीन हाेती. यात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याने गेल्या दाेन वर्षांत तब्बल वेळा ट्युबवेल केली. या सर्व ट्युबवेल पाणी लागल्यामुळे फेल गेल्या. ट्युबवेलमुळे डाेक्यावर कर्जाचा डाेंगर झाल्याने त्याने शेती विक्री करून उसनवारीचे कर्ज फेडले. शेती विकल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन राहिले नसताना डाेक्यावर मात्र कर्जाचा डाेंगर कायम हाेता. या विवंचनेत जितेंद्र जावळे याने जुलै राेजी सकाळी घरात विष प्राशन करून अात्महत्या केली. जितेंद्र हा एकुलता मुलगा असून त्याच्या पश्चात अाई वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार अाहे. भादली येेथे अाठवड्यामध्ये शेतकरी अात्महत्येची दुसरी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...