आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे करीत नाहीत; बदनाम आम्ही ,मंत्री पाटील यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान होऊन दळणवळण, पाणीपुरवठा, वीज पुरवठा या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्या सेवा प्राधान्यक्रमाने सुरळीत करा, असे निर्देश देत तुम्ही काम करीत नाही बदनाम आम्ही होतो, असे खडे बोल राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.

सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. या वेळी विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना मंत्री पाटील यांनी जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी मी रस्त्यावरचा माणूस आहे. दररोज लोकांना भेटतो. त्यामुळे माझ्याशी खोटे बोलू नका. तुम्ही कामे करीत नाहीत, बदनाम मात्र आम्ही होतो, अशा शब्दात महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. मंत्री झाल्यानंतर त्यांनी ही पहिलीच बैठक घेतली.

निधी परत गेल्यास कारवाईचा इशारा
धरणगाव पालिकेतील ११ कोटींची विकासकामे आचार संहिता लागण्यापूर्वी पूर्ण करा. त्याबाबत नियोजन करा. सप्टेंबरपर्यंत कामाचे लेखापरीक्षण झाले पाहिजेत. निधी परत गेल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिला.
महिला अधिकारी असल्याने मर्यादा
धरणगावनगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी मॅडम आम्ही बहिणीपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केले. महिला अधिकाऱ्यांमुळे आमच्यावर मर्यादा येतात. दुसरा अधिकारी असता तर आम्ही शांत बसलो नसतो, अशा शब्दात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुनावले. धरणगाव तालुक्यात केवळ दोनच शेततळ्यांचे काम झाल्याबाबत त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना विचारणा केली. कृषी साहाय्यक ग्रामसवेकांची तालुक्यात संख्या वाढवून देण्याची सूचना त्यांनी सोनवणे यांना केली.
ठिकठिकाणी ६५ ट्रान्सफॉर्मर खराब झाले
सध्यापावसामुळे शेतात वीज पुरवठ्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग हा गावातील वीज जोडण्यांच्या दुरुस्तीसाठी वापरावा. सध्या पावसाच्या दिवसात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना वीजपुरवठा आवश्यक आहे. अन्यथा गावात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करावा लागेल गावांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. ठिकठिकाणी ६५ ट्रान्स्फार्मर खराब झाले आहेत ते ट्रान्स्फार्मर तातडीने बदलावे. तसेच रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एस.टी. बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी रस्त्यांचीही डागडूजी करुन एस.टी.बसेसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात असेही निर्देश सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पुुढे वाचा... वसुली अधिकारीच चिरीमिरी घेतात
बातम्या आणखी आहेत...