आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळीपेठेत दोन गटात हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोळीपेठभागात रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून परिसरात तणावसदृश परिस्थिती होती. या हल्ल्यात तलवार, लाठ्या-काठ्यांचा वापर केला.
बालाजी मंदिरामागील कोळीपेठेत सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दोन गटात तलवार, लाठ्या-काठ्यांसह हाणामारी झाली. तोंडाला रुमाल बांधून पाच-सहा तरुणांनी या भागातील नागरिकांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी वाहनांची रिक्षेची तोडफोड केली. यात जावेद सय्यद जमीर रा. मणियार मोहल्ला, आरिफ मुसा मणियार, तनवीर शेख करीम रा. मणियार हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित तिघांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता. शनिपेठ पोलिस ठाण्यातून पोलिस जिल्हा रुग्णालयात जखमींकडून घटनेची माहिती घेण्यासाठी रवाना झाले होते.