आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनींची छेड काढणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिलामहाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण अल्पवयीन मुलींचे फोटो काढून त्यांच्या कुटुंबीयांना धमकावत होता. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील विद्यार्थिनीला क्लासला जाताना-येताना संशयित संजय सुनील रंधे हा तरुण घरापर्यंत पाठलाग करून मोबाइलमध्ये फोटो काढून छेड काढत होता. संजयने तिच्या काकांनाही मारहाण केली. अखेर पीडित मुलीने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजयला ताब्यात घेऊन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...