आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याच्या युवकाचा तापीत बुडून मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दोंडाईचा येथील पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि धुळे येथील रहिवासी योगेंद्र संतोष शेवाळे (वय 29) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी 11 वाजता तापीपात्रात तरंगताना आढळला.

हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी सकाळी राजेंद्र भंगाळे यांना जुन्या पुलाजवळ एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तापीपात्र गाठून मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगेत ओळखपत्र, एटीएम कार्ड होते. त्यावरील नोंदीवरून मयत युवकाची ओळख पटली. योगेंद्र संतोष शेवाळे (वय 29, धुळे) येथील तो रहिवासी आहे. आठ दिवसांपासून तो बेपत्ता होता.