आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात तरुण ठार नकारात्मक बातमी, भुसावर जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- तापी नदीच्या पुलावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात साकळी (ता. यावल) येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

दीपक ताराचंद सोनवणे (रा.साकळी) हा युवक कामानिमित्त दुचाकीने भुसावळकडे येत होता. तापी पुलाच्या मध्यभागीच समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत त्याची धडक झाली. या अपघातात दीपक जागीच ठार झाला. याचवेळी जय भद्रा अाॅटो सेंटरजवळ उभ्या असलेल्या मनोज बारी यास पुलावर काय गर्दी झाली आहे? हे निदर्शनास आले. तो पाहण्यासाठी जवळ आला, त्याने दीपकला ओळखले. मृत दीपकच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तर दुसरा दुचाकीस्वार हा शेंदुर्णी येथील रहिवासी असून त्याचे नाव कडू बारी असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साकळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद निळे यांनी मदतकार्य केले. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी साकळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...