आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदखेड्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिंदखेडा - शेतीतून अपेक्षित उत्पन्न आले नाही. त्यात घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि वर्षभर कसे जगायचे? या विवंचनेतून जोगशेलू (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकऱ्याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुहास पंढरीनाथ पाटील (देसले, वय ३५) असे त्याचे नाव आहे.

विविध कार्यकारी सोसायटीचे ७५ हजार कर्ज घेऊन मोठ्या उमेदीने सुहासने सारे पैसे शेतीत ओतले. मात्र, पुन्हा पावसाने दगा दिला. लागलेला खर्च निघण्याइतकेही उत्पन्न शेतीतून मिळाले नाही. त्यामुळे तो खचून आर्थिक विवंचनेत सापडला. सुहासची पत्नी गर्भवती असून, बाळंतपणासाठी माहेरी गेलेली हाेती.