आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे दुबार पेरणीच्या संकटमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- भिलाली येथील दिनेश पुंडलिक माळी (वय-35) या तरुण शेतकर्‍याने आज (बुधवारी) शहापुर रस्त्यावरील पांझरा नदीपात्रातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अतिशय मनमिळावु व होतकरु आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा या युवा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने पंचक्रोषित हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परीवार आहे.

सायंकाळी 7 वाजता भिलाली येथे शोकाकूल वातावरणात दिनेश माळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर पाच ते सहा लाखाचे पीक कर्ज तसेच ठिबक सिंचनासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज होते, अशी माहिती मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...