आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शॉक लागून युवकाचा मृत्यू; कुटुंबाचा आधार गेला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या आज (सोमवारी) होणार्‍या निवडणूक मतमोजणीसाठी तयारी सुरू असताना ध्वनिक्षेपकाची जोडणी करीत असता लक्ष्मीनगर येथील गोपाळ यादव महाजन या 30 वर्षीय युवकाचा रविवारी दुपारी 11.30 वाजता विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.

महापालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवारी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. त्यासाठी शनिवारपासूनच तेथे विविध प्रकारची व्यवस्था केली जात होती. मतमोजणीच्या ठिकाणी सुरू असलेली प्रक्रिया बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना ऐकू यावी यासाठी जागोजागी ध्वनिक्षेपक बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी न्यू आरके इलेक्ट्रिक यांना मक्ता देण्यात आला होता. रवी कोल्हे हे मक्तेदार आहेत. गोपाळ ध्वनिक्षेपक बसवून शिडीवरून खाली उतरत असताना शेजारीच विजेचा प्रवाह सुरू असलेल्या आवरण निघालेल्या खुल्या वायरला त्याचा स्पर्श झाल्यामुळे त्याला धक्का बसला. त्यामुळे गोपाळ खाली कोसळला. त्याच्या सहकार्‍यांनी बेशुद्धावस्थेत त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.


कुटुंबाचा आधार
गोपाळ हा मेहनती युवक होता. तो वयाच्या 12 व्या वर्षांपासून लाकूडपेठ येथील श्रीनाथजी सॉ मिल येथे कामाला होता. रविवारी सुटी असल्यामुळे त्याने ध्वनिक्षेपक बसविण्याच्या कामाला जाण्याचे ठरविले होते. पत्नीचा रोष पत्करून गोपाळने एका दिवसाचा रोज मिळण्याच्या आशेने तो निवडणुकीच्या कामाला गेला होता. गोपाळची प}ी वनिता जिल्हा रुग्णालयात पोहचताच तिला ग्लानी आली. 16-17 वर्षांपासून श्रीनाथजी सॉ मिल येथे काम करणारा गोपाळ हा कुटुंबाचा आधार होता, असे सॉ मिलचे संचालक सुधीर शाह यांनी सांगितले.

न्याय मिळण्याची मागणी
27 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे प्रचार बॅनर लावत असताना शरद चौधरी याचाही विजेच्या धक्कयाने मृत्यू झाला होता.उमेदवाराने रुग्णालयात साधी चौकशीही केली नाही. शरद हा कुटुंबाचा आधार होता. त्यामुळे आता ‘त्या’ संबंधित उमेदवारावर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शरदचे वडील श्यामराव चौधरी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.