आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या मृत्यूप्रकरणी मालवाहू रिक्षाचालकावर अखेर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मालवाहू रिक्षाच्या टपावर बसलेला असताना शिवाजीनगर उड्डाण पुलावरील क्रॉसबारचा डाेक्याला फटका बसून किनोद करंज येथील तरुणाचा १८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने रविवारी रिक्षाचालक योगराज पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
महेंद्र निंबा धनगर (वय २१, रा. किनोद करंज) हा तरुण (क्र.एमएच-१९/एस-९७४२) या मालवाहू रिक्षातून शेतमाल घेऊन जळगावात येत होता. तो रिक्षाच्या टपावर बसलेला असताना त्याच्या डोक्याला शिवाजीनगर उड्डाण पुलावर बसवलेल्या लोखंडी क्रॉसबारचा फटका बसल्याने तो रक्तबंबाळ होऊ खाली कोसळला. चालक योगराज पाटील याने रिक्षा थांबवून जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, तेथे तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी रविवारी रिक्षाचालकाविरूध्द शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...