आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल-औरंगाबाद बसमध्ये प्रवास करतांना तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव:  यावल-औरंगाबाद बसमधून प्रवास करीत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील गोंदेगावच्या तरूणाला स्वातंत्र्य चौकात अचानक चक्कर येवून छातीत दुखू लागले. त्यामुळे चालकाने बस थेट जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेली. मात्र उपचारा दरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला. 
 
 अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील प्रकाश पद्माकर उदगीर (वय ३६) हे २५  रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास बसस्थानकावरून यावल-औरंगाबाद या बसमध्ये बसून त्यांच्या गावाकडे जात हाेते. बस स्वातंत्र्य चौकात असताना त्यांना अचानक चक्कर येवून छातीत दुखू लागले. यावेळी बस चालक रविंद्र अाधार साेनवणे यांनी बस तत्काळ आकाशवाणी चौकातील खासगी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र उपचारा दरम्यान प्रकाश उदगीर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालक रवींद्र सोनवणे यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. या प्रकारामुळे बस बराच वेळ जळगाव शहरात थांबुन होती.
बातम्या आणखी आहेत...