आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढणा-या टवाळखाेरास चोप, भुसावळच्या तरुणाला दिले पोलिसांच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुलींच्या छेडछाडीचे प्रकार थांबावेत म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी निर्भया तसेच एक विशेष पथक तयार केले. मात्र, त्यांची कारवाई काही दिवसांपासून थंडावली आहे. त्यामुळे या टवाळखाेरानी पुन्हा धुमाकुळ सुरू केला अाहे. भुसावळ येथून ये-जा करणाऱ्या केसीई सोसाईटीच्या महिला अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनींना गुरुवारी कोर्ट चौकात दोन टावळखाेरांनी छेडले. मुलींनी आरडाओरड केल्याने त्यातील एकाला रस्त्यावरून जाणाऱ्या दोन तरुणांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले, तर एक पळून जाण्यात यशस्वी झाला.
केसीई सोसायटीच्या अध्यापक महाविद्यालयात भुसावळच्या विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्या दररोज रेल्वेने ये-जा करतात. गेल्या एक महिन्यापासून अब्दुल कादीर अब्दुल रहीम (वय २४, रा. खडका चौक, भुसावळ) आणि त्याचा मित्र हरीश (पूर्ण नाव माहीत नाही) मुलींच्या मागे जात होते. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या विद्यार्थिनी महाविद्यालयातून रेल्वेस्थानकाकडे जात असताना कोर्ट चौकात दोघांनी अडवून एका विद्यार्थिनीचा हात धरल्याने ितने आरडाओरड केली. त्या वेळी मागून येणाऱ्या प्रशांत सुरेश माळी आणि पवन राजकुमार धारेला यांनी त्या तरुणांना हटकले. मात्र, त्यांनाही िशवीगाळ केली. त्या वेळी अब्दुल याला पकडून चांगलाच चोप दिला. मात्र, त्याचा मित्र हरीश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अब्दुल याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर
िजल्हाभरातीलविविध गावांतून हजाराे विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. गुरुवारी घडलेल्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. या टवाळखाेरांना वठणीवर अाणण्यासाठी पाेिलस प्रशासनाने िनर्भया पथक िनयुक्त केले हाेते. परंतु ते ही सध्या सुस्त झाल्याने मुलींची सुरक्षा धाेक्यात अाली अाहे. त्यामुळे पाेिलसांनी टवाळखाेरांचा बंदाेबस्त करण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज अाहे.