आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात बहिणीच्या लग्नाची बोलणी सुरू; महामार्गावर भावाचा अपघातात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोन बहिणींचा एकुलता असलेला भाऊ पगार घेण्यासाठी रिक्षाने पाळधी परिसरात गेला असताना घरी लहान बहिणीच्या विवाहासंदर्भात नवऱ्या मुलाकडची मंडळी आली हाेती. घरी ही बोलणी सुरू असतानाच महामार्गावर ऑटोरिक्षा एसटीमध्ये झालेल्या अपघातात भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सागर भालचंद्र सूर्यवंशी (वय १९, रा. समतानगर) असे त्याचे नाव आहे. तर समतानगरातील समाधान एकनाथ सपकाळे (वय ३५) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. सपकाळे हे मूळ बोदवड तालुक्यातील जामठी येथील आहेत. ते समतानगरातील मेहुणे युवराज सूर्यभान चौधरी यांच्याकडे राहतात. दरम्यान, रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास समाधान सागर हे दोघे याच रिक्षाने पाळधीकडे गेले होते. सागर हा फर्निचरचे काम करीत असून पगाराचे पैसे घेण्यासाठी तो समाधान सपकाळे यांच्या रिक्षात (एमएच- १९, व्ही- ८६३२) गेला होता. परत येताना विद्यापीठाच्या गेटजवळ बस (क्र. एमएच- २०, बीएल- ३३६३) रिक्षात जोरदार धडक झाली. त्यात सागर रिक्षातून बाहेर फेकला जाऊन त्याला बसची धडक बसली या धडकेत तो जागीच मृत झाला. तर समाधान सपकाळे हे गंभीर जखमी झाले.

जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी
रविवारी दीपालीला पाहण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील पाहुणे घरी आले होते. सागर पगार आणण्यासाठी जातो, असे सांगून घरातून गेला. त्यामुळे तो या बैठकीला थांबला नव्हता. त्यानंतर दीड-दोन तासांनी त्याच्या अपघाताची बातमी त्याचे मामा गुलाब देवरे यांना फोनवरून मिळाली. या वेळी घरात लग्नाची बोलणीच सुरू होती. फोन आल्यानंतर कुटंुबीयांसह पाहुण्यांनीदेखील सामान्य रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे समतानगर परिसरात शोककळा परसली आहे. रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. जखमी सपकाळे यांना उपचारासाठी सायंकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दीड वर्षापासून शहरात
मंगलाबाईभालचंद्र सूर्यवंशी ह्या दोन मुली एका मुलासह समतानगर भागात भाऊ गुलाब देवरे यांच्या शेजारी दीड वर्षापासून राहतात. मोठी मुलगी शीतल हिचे लग्न झाले असून ती सध्या सुरतला राहते. तर लहान मुलगी दीपाली ही अविवाहित आहे. या दोन्ही बहिणींचा सागर हा एकुलता भाऊ होता. सूर्यवंशी कुटंुब हे मूळ सोनगीर वाघाडी येथील आहे. मुलं लहान असतानाच मंगलाबाईंचे पती घरातून निघून गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...