आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाजारी मुलीला बघण्यासाठी जाणाऱ्या पित्याला टँकरने चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रुग्णालयात दाखल आपल्या एक वर्षाच्या आजारी मुलीला पाहण्यासाठी जात असताना दुचाकी स्वारास ऑइल टँकरने जोरदार धडक देऊन चिरडले. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा दूध फेडरेशनजवळ घडली. त्यात दुचाकीवरील मुलीच्या चुलत भावालाही गंभीर दुखापत झाली.
गेंदालाल मिलमधील सुरेशदादा जैननगरातील रहिवासी शेखर बैजनाथ शर्मा(वय २५) यांचे दाेन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना देवयानी (वय १) नावाची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून देवयानीची प्रकृती खराब असल्याने तिच्यावर प्रतापनगरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू अाहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शेखर शर्मा यांनी त्यांचे माेठे भाऊ किरण शर्मा यांच्याकडून त्यांची विनाक्रमांकाचीनवीन माेटारसायकल घेतली. शेखर शर्मा यांच्यासाेबत पुतण्या अाेम (वय ५) यालासुद्धा घेतले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जिल्हा दूध संघाच्या समाेरून जात असताना भाग्यश्री पेट्रोलपंपाच्या पुढे त्यांच्या माेटारसायकलला मागून भरधाव येणाऱ्या अाॅइलच्या टँकरने (क्र. एम.एच.४६ एफ ०५६८) जाेरदार धडक दिली. त्यात शेखर ट्रकच्या चाकाखाली अाले तर अाेम बाजूला फेकला गेला. त्यात शेखर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर ओम किरकोळ जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी दोघांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना लगेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान शेखर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किरण शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरचालकाविराेधात शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. टँकरचालक मुन्नालाल सीताराम यादव (वय ३६, रा. शिवडी, मंुबई) याला अटक केली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले करीत आहे.

ज्या ठिकाणी काम करीत हाेते, तेथेच झाला अपघात
अपघातातील मृत शेखर शर्मा हे एस. के. अाॅइल मिलमध्ये नाेकरीला हाेते. रविवारी त्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेले टँकरही एस. के. अाॅइल मिलमधून अाॅइल भरून मुंबईकडे रवाना हाेत हाेते. त्या वेळी रस्त्यात शेखर यांच्या माेटारसायकलला धडक दिली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ऑइल मिलमधील शेखर यांच्या मित्रांनीच त्याच्या भावाच्या मोबाइलवर फोन करून अपघाताची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...