आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थ्रेशरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ममुराबाद परिसरातील खेडी खुर्द (ता. जळगाव) शिवारात सोयाबीन काढण्याच्या वेळी थ्रेशरमध्ये अडकून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी वाजता घडली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी तालुका पोलिसांच्या मदतीने मशीनमधून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, गेल्या साेमवारी नेरी बुद्रूक शिवारातही सोयाबीन काढत असताना मशीनमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाला होता.
कुटुंबीयांचा अाक्राेश
भिकनथ्रेशरमध्ये अडकल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तत्काळ शेताकडे धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणी भिकनचा विदारक स्थितीतील मृतदेह पाहून कुटुंबीयांनी अाक्राेश केला. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला.

थ्रेशरमध्ये अडकल्यानंतर भिकन वाघुळे याचा मृतदेह काढणेही कठीण झाले हाेते. तालुका पाेलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर शिंपी, शिरीष पाटील, प्रफुल्ल धांडे, भरत पाटील, मगन मराठे, शैलेश चव्हाण घटनास्थळी पोहोचल्यावर भिकनला मशीनमधून काढण्याचा प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने दाेन तासांच्या प्रयत्नानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात यश अाले.

दोन तासानंतर मशीनमधून मृतदेह काढला बाहेर
खेडी खुर्द शिवारात सोयबीन काढताना याच थ्रेशरमध्ये अडकून भिकन वाघुळे या तरुणाचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...