आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी पळवल्याचा आळ; निराश तरुणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलगीप ळवण्याचा अाळ सहन झाल्यामुळे नैराश्य अालेल्या एका तरुणाने गुरुवारी शिव काॅलनी येथील राहत्या घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. अात्महत्या करण्यापूर्वी या तरुणांने अापल्या अाई, वडील, अाजी, मित्र इतरांच्या नावाने प्रत्येकी एक पान अशी सात पानांची चिठ्ठी लिहिली अाहे. ही घटना गुरुवारी दुपारी वाजता उघडकीस अाली. मृत तरुण हा यावल तालुक्यातील रहिवासी असून ताे १५ दिवसांपूर्वीच शिव काॅलनीत राहण्यास अाला हाेता.
मृत तरुणाचे नाव पवन सुभाष पाटील (वय २१, रा.बाेरावल, ता.यावल) असून त्याचे अाई-वडील शेतमजुरी करतात. या तरण्याताठ्या मुलाने अात्महत्या केल्याचे कळताच त्याच्या अाई-वडिलांना जबर धक्का बसला. त्याच्या थाेऱल्या बहिणीचे लग्न झाले अाहे. तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून ताे जळगावात नोकरीच्या निमित्ताने राहण्यासाठी आला होता. मुलगी पळवून नेल्याचा अारोप झाल्यामुळे त्याची बदनामी झाली. यातून त्याचा मानसिक छळही झाला, असे त्यांच्या सुसाइड नोटमधून स्पष्ट होते आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे.

पवन हा तंत्रनिकेतनचा डिप्लोमा पूर्ण करून नुकताच बांभाेरी येथील चेचीस ब्रेक इंटरनॅशनल कंपनीत कामाला लागला होता. १५ दिवसांपूर्वीच तो शिव कॉलनीत प्रमोद पीतांबर पाटील (गट नंबर ६० प्लॉट नंबर ६) यांच्या घरात दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत राहण्यासाठी आला हाेता. त्याच्यासोबत त्याच्या कंपनीत कामाला असलेला गाळण (ता.पाचोरा) येथील सचिन मुरलीधर पाटील हा राहत होता. बुधवारी रात्री पवन रात्रपाळीला गेला हाेता. गुरुवारी पहाटे तो घरी परतला तर रुमपार्टनर सचिन सकाळी ड्यूटीवर गेला होता. पवनने मित्र गौरव दिनेश देशमुख याला गुरुवारी बोरावल येथे घरी जायचे सांगून त्याची दुचाकी मागितली होती. त्यानुसार गौरव दुपारी वाजता काही मित्रांसह पवनला दुचाकी देण्यासाठी शिव कॉलनीत आला. पवनच्या खाेलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्यांनी आवाज दिला. बराच वेळ अावाज देऊनही दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी धक्का देऊन दरवाजा उघडला. त्या वेळी त्यांना पवनने पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. गौरव त्याच्या मित्रांनी या घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सायंकाळी वाजता पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवन याच्यावर मुलगी पळवल्याचा आळ घेण्यात आला होता. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. हीच बाब त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहीली आहे. मात्र, त्या मुलीविषयी त्याने चिठ्ठीमध्ये अधिक भाष्य केलेले नाही.

पोलिसांची उशिराने एंट्री
पाेलिसांना दुपारी वाजता घटना कळवल्यानंतर दुपारी वाजता सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे पथकासह आले. त्यांनी वाजेपर्यंत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. पवनचे कुटुंबीय सायंकाळी जळगावात पोहोचले. मृतदेह पाहताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
चिठ्ठीत प्रत्येक पानावर काय लिहिले?
पहिल्या पानावर पवनने त्याला होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे. यात ‘सध्या मला खूप मानसिक त्रास दिला जात आहे. जी मुलगी पळून गेली आहे तिच्याशी माझा काहीच संबंध नाही. मला दोषी ठरवण्यात आले आहे. हा डाग पुसता येणार नाही, असे आयुष्य नकाे, त्यामुळे मला टेन्शन मुक्त व्हायचे आहे’.

दुसरे पान मित्र सागरसाठी अाहे. यात लिहिले अाहे की, सागर तू माझा चांगला मित्र आहेस. माझ्या पाठीमागे आई-वडिलांची काळजी घे. आपली साथ एवढीच हाेती.
तिसरे पान आजीसाठी अाहे. यात आजी तू म्हातारी झाली अाहेस. तरी माझी काळजी घेत होतीस. आपली साथ इथपर्यंतच होती.
चाैथे पाचवे पान बेस्ट फ्रेंडसाठी अाहे. मित्रांनी चांगली साथ दिली. सागरने मला एक वेळा वाचवलं; पण माझी काहीच चूक नाहीये. थंॅक्यूू , सॉरी.
सहावे सातवे पान आई-वडिलासाठी अाहे. यात तुम्ही मला चांगलं, मोकळ आयुष्य जगायला दिले. आई रोज फोन करून विचारपूस करीत होती. वडिलांनी कधी रागावलं नाही. मात्र, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.
बातम्या आणखी आहेत...