आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशिराबादजवळ अपघात तरुण ठार, दोन जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नशिराबाद - येथील महामार्गावर कार ट्रकची समोरासमोर धडक होऊन जळगावातील कारचालक जागीच ठार झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास महामार्गावरील मुंजोबा मंदिराजवळ घडली.

ट्रक (क्र. डब्ल्यूबी- २३, बी- ६२२१) जळगावकडून भुसावळकडे जात असताना समोरून येणारी कार (क्र. एमपी- १२, सीए- २०३७)ला धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर होऊन चालक दीपक मूलचंद तोतलानी (वय ३५, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) हा जागीच ठार झाला. तर कारमधील घनश्याम सनमुखदास वासवानी संतोष भोलाराम दावाणी (जळगाव) जखमी झाले. कार बऱ्हाणपूरहून जळगावकडे जात होती. याबाबत फिर्याद अमित घनश्यामदास वासवानी (वय २३, रा. जळगाव) यांनी दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत.