आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूमुळे पित्याचे हॉटेल मॅनेजमेंटचे स्वप्न भंगले, रेल्वेत मोबाइल चोरामुळे तोल जाऊन नरेशचा अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सचखंड एक्स्प्रेस या रेल्वेतून प्रवास करताना नरेश चंद्रप्रकाश जयस्वाल (वय १९) या तरुणाचा रविवारी सायंकाळी वाजता जळगावजवळ चोरट्याकडून मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या नरेशचे वडील एका हॉटेलमध्ये मजुरी करतात. चांगल्या संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिलेल्या नरेशच्या वडिलांचे स्वप्न मात्र या घटनेने अपूर्ण राहीले आहे. 
 
अाैरंगाबाद शहरातील पैठण गेट परिसरातील दाळवाडीत चंद्रप्रकाश जयस्वाल (वय ५०) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. नरेश चंद्रप्रकाश जयस्वाल (वय १९) हा त्यांचा एकुलता एक मुलगा. जयस्वाल अाैरंगाबाद येथील हाॅटेलमध्ये काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केल्यानंतरही त्यांनी मुलगा नरेशला हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण देण्याचा चंग बांधला. फक्त शिक्षणच नव्हे, तर चांगल्या संस्थेतून शिक्षण देण्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शासकीय इन्स्टिट्यूट अाॅफ हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात २०१६ मध्ये प्रवेश घेऊन दिला. तीन वर्षांनंतर नरेश शिक्षण पूर्ण करून घरची परिस्थिती व्यवस्थित करेल, असे स्वप्न जयस्वाल यांनी बघितले हाेते. मात्र, रविवारच्या घटनेमुळे सर्व स्वप्न अधुरे राहिले आहे. 
 
नरेश जागीच ठार 
मार्चमहिन्यात हॉटेल मॅनेजमेंटची परीक्षा असल्याने रविवारी सचखंड एक्स्प्रेसने नरेश त्याचा मित्र अपूर्व रघुनाथ जानबा (वय १९) हे ग्वाल्हेर येथे जाण्यासाठी निघाले. त्यांचे रिझर्व्हेशन एस-१२ या बोगीत होते. जळगाव स्थानकावरून गाडी भुसावळकडे मार्गस्थ होत असताना नरेशला फोन आला. त्यामुळे तो फोनवर बोलत रेल्वेच्या दरवाजाजवळ आला. त्या वेळी गाडी तहसीलजवळ आली असता, तेथे उभ्या असलेल्या चोरट्याने त्याच्या हाताला झटका देत मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल जाऊन नरेश धाडकन खाली दगडावर पडला. त्यात डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
 
वडिलांचे डाेळे घेत हाेते मुलाचा शाेध 
मुलाचाअपघात झाल्याचे कळल्यानंतर चंद्रप्रकाश जयस्वाल, दत्तात्रेय शंकर कासार, अजिंक्य मालघर, सचिन वाघ, प्रशांत पंडित, किशाेर कासार हे नरेशला घेण्यासाठी साेमवारी पहाटे जळगावात अाले. मात्र, नरेश गेल्याचे समजल्यावर नातेवाइकांनी त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही. सिव्हिलच्या अावारात बसून चंद्रप्रकाश जयस्वाल यांचे डाेळे मुलाला शाेधत हाेते. शेवटी काही वेळाने त्यांना अापल्याला नरेशला अाैरंगाबादला घेऊन जायचे असल्याने तुम्ही पुढे निघा; रुग्णवाहिकेत नरेशला घेऊन येताे, असे सांगण्यात आले. दुपारी वाजता नातेवाइक नरेशचा मृतदेह अाैरंगाबादकडे घेऊन गेले. 
 
बातम्या आणखी आहेत...