आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण तलावात बुडून पाळधीत मुलाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाळधी येथे खासगी जलतरण तलावात पाय घसरून बुडून १२वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाळधी (ता.धरणगाव) येथे शरद शिवनारायण कासट यांचा खासगी जलतरण तलाव आहे. या ठिकाणी सोमवारी सायंकाळी चेतन रमेश भालेराव (वय १२) हा मुलगा आला. तलावाजवळ उभा असताना त्याचा पाय घसरला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्या वेळी जवळ असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. ते ऐकून साहेबराव पाटीलसह तिघांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चेतनला बाहेर काढून सिव्हिलमध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.