आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youngster Live Save In Railway Accident In Jalgaon

धावती रेल्वे अंगावरून जाऊनही युवक बचावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर देवळाली-भुसावळ शटल ही गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एक युवक खाली पडला. धावत्या रेल्वेचे चार डबे अंगावरून जाऊनही तो बचावला. ही अंगावर शहारे आणणारी घटना सोमवारी सकाळी १० वाजता घटना घडली.

रेल्वेस्थानकावर देवळाली-भुसावळ शटल प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सकाळी १० वाजता थांबली. गाडीला अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. चढणार्‍या आणि उतरणार्‍यांची धावपळ सुरू होती. त्यात गाडी सुरू झाल्यावर कपिल प्रेमलाल कासजे (२५) हा युवक गाडी पकडण्यासाठी धावत होता. त्याच वेळी समोरून येणार्‍या एका महिला पुरुषाशी त्याची धडक झाली. त्यात तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडला. शौचालयाचा पाइप त्याच्या कमरेला लागल्याने तो एकदम फिरला आणि दोन डब्यांच्या मध्यभागी सरकला.

गाडीत बसलेल्या आशिष नावाच्या प्रवाशाने समयसूचकता दाखवून रेल्वेची साखळी ओढली. तोपर्यंत त्याच्या अंगावरून चार डबे गेलेले होते. लहान दादर्‍याजवळ गेल्यावर गाडी थांबली. स्थानकावर धावपळ उडाली. युवक गाडीखाली सापडला. त्याचा मृत्यू झाला असेल, असे सगळ्यांना वाटायला लागले. मात्र, कपिल गाडी खालून चालत जाऊन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन बसला. किरकोळ दुखापतीव्यतिरिक्त तो एकदम ठणठणीत हाेता. हा प्रकार पाहून स्थानकावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर रेल्वे पाेलिसांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिका बाेलावून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

साक्षात मृत्यू पाहिला
साक्षा तमृत्यू पाहिल्याचे आतापर्यंत फक्त चित्रपटात किंवा दुसर्‍यांच्या तोंडून ऐकले होते. मात्र सोमवारी घडलेल्या घटनेत मी खरेच साक्षात मृत्यू पाहिला. माझे नशीब बलवत्तर हाेते म्हणूनच आज मी वाचलो. कपिलकासजे, जखमी युवक