आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे - स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे जनआंदोलन असा ज्याचा वारंवार उल्लेख केला गेला, ज्या आंदोलनात देशभरातील तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, ते आंदोलन नेमके कशासाठी छेडण्यात आले? याचा युवापिढीला अवघ्या काही महिन्यातच साफ विसर पडला आहे. ‘दिव्य मराठी’ने गेल्या वर्षातील जनलोकपाल आंदोलनाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता हे धक्कादायक सत्य समोर आले.
‘दिव्य मराठी’ने जळगावातील सर्व प्रमुख महाविद्यालयांबरोबरच शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील 16 ते 25 वयोगटातील युवकांना अचानक गाठून काही प्रश्न विचारले. या सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. या सर्वेक्षणातील प्रश्नोत्तरात फक्त होय आणि नाही, असे दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. माहिती नाही सांगता येत नाही, अशी अनिश्चित उत्तरे ग्राह्य धरली नाहीत.
अण्णा हजारे यांचे आंदोलन स्मरणात आहे काय? सरकारी लोकपालला आक्षेप घेणारी अण्णांच्या आंदोलनातील मुख्य मागणी कोणती होती? अण्णांच्या आंदोलनानंतर त्यांचे तत्कालीन सहकारी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय? या राजकीय पक्षात आपण सहभागी होणार का? भारतीय प्रजासत्ताकाबाबत आपण समाधानी आहात काय?आणि युवकांनी राजकारणात आले पाहिजे का? हे सहा प्रश्न सर्वेक्षणात विचारले गेले होते. अण्णा हजारे यांचे आंदोलन 68 टक्के युवकांच्या स्मरणात असले तरी जनलोकपालसाठी मुख्यत: हे आंदोलन छेडले गेल्याचे 88 टक्के युवकांना माहिती नाही. 60 टक्के युवकांना आम आदमी पार्टी माहिती नाही. अण्णा किंवा केजरीवालांच्या राजकीय पक्षात फक्त 12 टक्के युवक सहभागी होऊ इच्छितात. दुसरीकडे तब्बल 72 टक्के युवकांना राजकारणात आले पाहिजे, असेही वाटते. 92 टक्के युवक भारतीय प्रजासत्ताकाच्या सद्य:स्थितीबाबात समाधानी नाहीत.
अण्णांच्या टीममधून बाहेर पडलेल्या अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी बद्दल युवकांना किंचितही आकर्षण उरलेले नाही. येणार्या काळात आम्ही युवकच राजकारण, प्रशासनात येण्यासाठी प्रय}शील आहोत आणि त्यातूनच मार्ग काढून लोकशाही सक्षम बनऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे उच्चाटन करण्याची जबाबदारीही युवकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.