आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉइल अंडे खाण्यावरून युवकाला बेदम मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अंडा-पावच्या गाडीसमोर बॉइल अंडे खाण्याच्या कारणावरून दोन जणांनी एका युवकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली हाेती. या प्रकरणी रविवारी युवकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्वनाथ रमेश सावंत (वय २४, रा.नशिराबाद) हा त्याचा मित्र गणेश कनगरे याच्यासोबत २६ रोजी अजिंठा चौफुलीजवळील मनोज विनोद (दोघे रा.कासमवाडी) यांच्या अंडा-पावच्या गाडीवर गेलेला होता. दरम्यान, बॉइल अंडे खाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्या दोघांनी विश्वनाथला बेदम मारहाण केली. या वेळी मध्यस्थी करणाऱ्या गणेशलाही मारहाण केली. या प्रकरणी मनोज विनोद यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून पत्नीस मारहाण
सारिका डफरे यांना त्यांचे पती गुणवंत डफरे यांनी पैसे मागण्याच्या कारणावरून रविवारी मारहाण करून दमदाटी केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.