आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरमार्गास लावण्यासाठी मुलास खरेदीचा प्रयत्न, कासमवाडीत आईसह दोन्ही मुलांना मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कासमवाडी येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलास गैरमार्गाला लावण्याच्या उद्देशाने त्याला एक लाख रुपयांत खरेदी करण्याचा प्रयत्न करीत चौघांनी मुलासह त्याचा भाऊ, आई यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी वाजता घडला. यात दोघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
जखमींनी सांगितल्याप्रमाणे, कासमवाडी येथे राहणारा विक्की भरत कोळी (वय १७ वर्ष) हा युवक भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने आपल्यासोबत गैरकामे करावी, यासाठी परिसरातील दोन तरुण त्याला त्रास देत आहेत. तसेच त्याला ताब्यात देऊन त्या मोबदल्यात एक लाख रुपये देऊ, असा ‘सौदा’ करण्याचा प्रयत्न हे तरुण करीत आहेत. पैसे दिल्यानंतर विक्की आम्ही सांगेल तसे काम करेल. आमच्या सोबत राहील, अशा धमक्या ते कोळी कुटुंबीयांना देत आहेत. सोमवारी दुपारी वाजता तीन तरुण एक महिला कोळी यांच्या घरी गेले. त्यांनी पुन्हा एकदा विक्कीचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईने विरोध केल्यानंतर त्यांनी विक्कीसह त्याचा मोठा भाऊ आनंद आईस मारहाण करण्यास सुरुवात केली. मारेकऱ्यांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉडने तिघांना बेदम मारले आहे. यात आनंदचे डोके फुटले असून विक्कीच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला आहे. विक्की अजय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच मारेकऱ्यांनी कोळी यांच्या घरातील सर्व वस्तूंची फेकाफेक केली आहे. 
 
वर्षभरापासून त्रास 
मारेकऱ्यांपैकीएक तरुण हा परिसरातील मंदिरात राहतो. तो गेल्या वर्षभरापासून विक्कीला त्रास देतो आहे. त्याला मिळवण्यासाठी तो कोळी कुटुंबीयांना एक लाख रुपयांची लालूच दाखवतो. विक्कीकडून गैरकामे करून घेण्याचा त्याचा इरादा आहे. परंतु कोळी कुटुंबीय तसेच स्वत: विक्कीनेदेखील या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे. तरी देखील समोरचा तरुण ऐकून घेत नाही. आता तो थेट मारहाणीपर्यंत आला अाहे, अशी माहिती विक्कीची आजी मथुराबाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 
 
पोलिसात तक्रार नाही 
दरम्यान,या मारहणीनंतर कोळी कुटुंबीय थेट रुग्णालयात दाखल झाले. एमएलसीने ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली. पोलिसांनी सोमवारी रात्री येऊन कोळी भावंडांची चौकशी केली; परंतु याप्रकरणी मंगळवारपर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. 
बातम्या आणखी आहेत...