आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळीराम झाडावर चढला; तोल जाऊन वीज खांबावर लटकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लटकलेल्या अवस्थेतील तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.)
जळगाव- दात घासण्याकरिता लिंबाची काडी घेण्यासाठी बुधवारी दुपारी एक तरुण जि.प.कॉलनीतील कडूनिंबाच्या झाडावर चढला. भरपूर मद्यप्राशन केले असल्याने झाडावरून त्याचा तोल जाताच हायटेन्शन वजिेच्या खांबावर पडला. सुदैवाने वीज प्रवाह खंडित झाल्याने तो बालंबाल बचावला. दीड तास तो तरुण खांबावर लटकलेला होता. दुपारी २.२० वाजता जि.प. कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ वजिेच्या खांबावर धमाका झाला. तरुण खांबावर उलटा लटकलेला पाहून कुणीतरी क्रॉम्प्टनला फोन लावला.

लगोलग क्रॉम्प्टनचे ब्रेक डाऊन लाइन पथकातील नंदू कोळी, संजय माळी, कुणाल वाघे, योगेश कोळी हे कर्मचारी आले. एक कर्मचारी दोरी घेऊन झाडावर चढला. त्याच्या कमरेला जाड दोरखंड बांधण्यात आला आणि त्याला हळूहळू खाली सोडण्यात आले. दरम्यान, खांबाच्या दाेन्ही बाजूला दाेन झाडे सुमारे १० फूट अंतरावर असून ताे खांबावर पडलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीड तास वाहतुकीचा खोळंबा
तरुण वीज खांबावर लटकल्याने त्याला पाहण्यासाठी जिल्हा परिषद कॉलनीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे महामार्गावर आकाशवाणी चौक ते खोटेनगरपर्यंत दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तसेच पिंप्राळा परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तरुणाला खाली उतरवल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा डावा हात, छाती, चेहऱ्याचा काही भाग शॉक लागल्याने भाजला आहे.
तरुण झारखंडचा : जखमी झालेला सिंहासन सोबनाथ नाग हा झारखंड राज्यातील देरडा, तहसील कुरुकेरा येथील ट्रकचा क्लिनर आहे. त्याच्या चालकाने त्याला जळगावात रस्त्यातच उतरवून दिले होते.
लिंबाची काडी घेण्यासाठी चढलो
- मी झारखंडचा रहिवासी असून ट्रक क्लिनर आहे. चालक मला सोडून निघून गेला. तेव्हापासून जळगावात भटकत आहे. दुपारी दात घासण्याकरिता लिंबाची काडी घेण्यासाठी झाडावर चढलो होतो. तोल गेल्याने पडलो.
सिंहासन नाग
फूट उंच विजेचा खांब
३२
के. व्ही. एवढा वीजप्रवाह
११
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या तरूणाला कसे खाली उतरवण्यात आले यश...
सर्व छायाचित्र : कालू शाह
बातम्या आणखी आहेत...