जळगाव - नवीन एसटी बसस्थानकामध्ये साेमवारी एका तरुणाने अर्धा तास चांगलाच गाेंधळ घातला. दुपारी वाजता तरुण अचानक बससमाेर अाडवा झाल्याने त्याच्या उजव्या खांद्याला गाडीची धडक बसली. वाहकाने त्याला बाजूला केले असता, त्याने वाहकाच्या कानशिलात लगावली. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी तरुणाला चाेप देऊन पाेलिसांच्या ताब्यात दिले. पाेलिस कर्मचारी तरुणाला घेऊन जात असताना त्याने थेट दुचाकीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण ताे असफल ठरला. या झटापटीत पाेलिस कर्मचारी तरुण किरकाेळ जखमी झाले. याप्रकरणी बसचालक वाहकाने जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे.
नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाला शिकत असलेला संजय उन्मेष पाटील (वय २०, रा. गिरिजा काॅलनी, जामनेर) हा जळगावात केटरिंगचे काम करून शिक्षण घेताे. साेमवारी दुपारी १२ वाजता मित्रांसाेबत जेवण केल्यानंतर ताे काही मित्रांसाेबत जामनेर येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकाकडे निघाला. दुपारी वाजता बसस्थानकातून जळगाव-नाशिक बस (क्रमांक एमएच-२०-बीएल-३०४५) बाहेर येत हाेती. संजय अचानक त्या बसच्या समाेर अाडवा उभा राहिला. बसचालक गाेरखनाथ नारायण महाजन (रा. विखरण, ता. एरंडाेल) यांनी प्रसंगावधान राखून अचानक ब्रेक लावले. त्यामुळे संजयच्या डाव्या खांद्याला धडक बसली. त्यानंतर वाहक अशाेक देवलाल लाेहार (रा. बहादरपूर, ता. पाराेळा) यांनी संजयला खाली उतरून बाजूला केले.मात्र, ताे पुन्हा अाडवा झाला. त्याला लाेहार यांनी पुन्हा बाजूला करून ते बसमध्ये बसण्यासाठी जात असताना संजयने त्यांच्या कानशिलात लगावली. त्या वेळी बसस्थानकात उपस्थितांनी संजयला चांगलाच चाेप दिला. बसस्थानकात ड्यूटीवर असलेले जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी अजित पाटील, हेमंत तायडे यांनी संजयला ताब्यात घेऊन दुचाकीवर बसवून पाेलिस ठाण्यात घेऊन जात हाेते. त्या वेळी त्याने धावत्या दुचाकीवरून उडी मारली. त्यामुळे दुचाकी फेकली जाऊन अजित पाटील यांच्या पायाला दुखापत झाली, तर संजयही किरकाेळ जखमी झाला. त्यानंतर त्याला पाेलिसांनी जिल्हापेठ ठाण्यात अाणले. त्या ठिकाणी पाेलिसांनी अाणि त्याच्या मित्रांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे काहीच बाेलला नाही. सुमारे अर्धा तास बसस्थानकात हा गाेंधळ सुरू हाेता. याप्रकरणी एसटी बसचालक अाणि वाहकाने जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे.
तणावातूनमानसिकता ढासळली
संजयच्या वडिलांचे निधन झालेे अाहे. त्याला एक लहान भाऊ असून, ताेही शिक्षण घेत अाहे. अाईचे अाजारपण, तर अाजीची प्रकृती गंभीर असून, त्या जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल अाहेत. बहीणही दीड महिन्यापासून प्रसूतीसाठी माहेरी अालेली अाहे. संजय हा केटरिंगचे काम करून उपजीविका चालवताे. एकदम अालेल्या खर्चामुळे कदाचित त्याची मानसिकता ढासळली असावी. त्यामुळेच त्याने असे पाऊल उचलले असल्याचा अंदाज त्याच्या मित्रांनी व्यक्त केला. संजयला त्याच्या मित्रांनी दुपारी २.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी ताे ‘वाचवा रे मला, काेण तरी वाचवा’ अशा अाराेळ्या मारत हाेता.