आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मेहरूण तलावात सापडला मृतदेह, 3 दिवसांपासून हाेता बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशविसर्जनासाठी मेहरूण तलावावर गेलेला जिल्हापेठेतील स्वामी विवेकानंदनगरातील युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण ताे सापडला नाही. गुरुवारी सकाळी वाजता मासेमारी करणाऱ्या युवकांना मृतदेह मेहरूण तलावात लाकडाच्या ओंडक्याला अडकलेला आढळून आला. चाैकशी केल्यानंतर ताे मृतदेह नितीन निंबाळकर यांचा असल्याची खात्री झाली अाहे. 
 
जिल्हापेठमधील स्वामी विवेकानंदनगरात गणेश मंडळातर्फे मंगळवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात अाले हाेते. या कार्यक्रमास नितीन शिवाजी निंबाळकर (वय २९) हा उपस्थित होता. दुपारी ३.३० वाजता तो घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यासाठी मेहरूण तलावावर गेलेला होता; पण मंगळवारी रात्री घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याच्याविषयी मित्रांकडे विचारणा केली. तसेच सर्वत्र शोधही घेतला. बुधवारी नातेवाइकांनी तांबापुरा, मेहरूण तलाव परिसरात त्याचा शोध घेतला; पण तो आढळून आला नाही. गुरुवारी सकाळी मेहरूण तलावावर काही युवक मासेमारी करण्यासाठी आलेले होते. तलावाच्या डाव्या बाजूला एका युवकाचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. 

तो मृतदेह लाकडी ओंडक्याला अडकलेला होता. ताे फुगलेला मृतदेह बाहेर काढून युवकांनी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. याबाबत नातेवाइकांना माहिती मिळाल्याने नितीनचे दोन भाऊ जिल्हा सामान्य रुग्णालयात धावत आले. त्यांनी शवविच्छेदन गृहात ठेवलेल्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर ताे नितीन याचाच असल्याचे कळाल्यानंतर त्यांना माेठा धक्का बसला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. नितीन हातमजुरीचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई दोन भाऊ असा परिवार आहे. 
 
नितीन हा गणेश विसर्जन करण्यासाठी मेहरूण तलावावर गेलेला होता. विसर्जन करीत असताना त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला असावा. मात्र, तलाव परिसरात विसर्जनासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी असताना कुणालाही हा प्रकार लक्षात येऊ नये? हे विशेष म्हणावे लागले. दरम्यान, नातेवाइकांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. 
बातम्या आणखी आहेत...