आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू, प्रिंपाळा भागात वर्षीय मुलासही डेंग्यूची लागण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून शनिवारी दुपारी डंेग्यूची लागण झालेल्या वाघनगरातील तरुणाचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विशाल रवींद्र ठाकूर असे तरुणाचे नाव आहे. डेंग्यू हाताबाहेर गेल्याने मृत्यू पावलेला हा तिसरा रुग्ण आहे. यापूर्वी रावेर येथील माधुरी धनंजय चौधरी आणि वैशाली रघुनाथ बावस्कर (सोयगाव,जि.आैरंगाबाद ) या दोन महिलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रिंपाळा भागात एका सात वर्षीय मुलास डेंग्यूची लागण झाली असताना त्याच्या वडिलांनी मागणी करूनही महापालिकेने गेल्या सहा दिवसांमध्ये त्याच्या घराच्या परिसरात स्वच्छता केली नाही.
विशाल याला तापामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू केल्यानंतर त्याला डेंग्यू पाॅझिटिव्ह साेबत जपानीस बी इनसेफेलायटीज या व्हायरल अाजाराने ग्रासल्याचे निदान झाले होते. त्याला उच्चप्रतिचा ताप येऊन मेंदूपर्यंत पाेहोचला होता. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी शुक्रवारीच सांगितले होते. अखेर शनिवारी दुपारी १२ वाजता त्याचा मृत्यू झाला.

विशाल हा बारावीत शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाघनगर परिसरात सध्या ४०० पेक्षा जास्त घरे असून नवीन वस्तीत वाढ होत आहे. येथील काही भाग महापालिका तर काही भाग सावखेड्याच्या ग्रामपंचायतीत येतो. त्यामुळे या भागात विकास कामे होत नाहीत. विशेष म्हणजे आता डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू असल्यामुळे साफसफाई तसेच अॅबेटिंग झाले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तक्रार करूनही उपयोग नाही
^माझा मुलगाडेंग्यू अाजारामुळे रुग्णालयात दाखल आहे. परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे. सफाई व्हावी म्हणून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे जाऊन तक्रार केली आहे. मात्र, त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. या भागात अनेक जण साथीच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. संग्रामसिंगपाटील, रहिवासी, विद्यानगर, पिंप्राळा

अयोध्यानगरात अॅबेटिंगचा फार्स
^अयोध्यानगरातील अशोकनगरभागात अॅबेटिंग झालेले नाही. पालिका कर्मचारी आले पण त्यांनी ठराविकच ठिकाणी अॅबेटिंग केले. सध्या या भागात टायफाइड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांनी अबालवृद्ध त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अॅबेटिंगसह साफसफाई केली पाहिजे. अॅड.महेशढाके, रहिवारी, अशोकनगर

पालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष
पिंप्राळ्यातील मुंदडा शाळेच्या परिसरात विद्यानगर हा भाग आहे. येथील कृष्णा संग्रामसिंग राजपूत (वय ७) या मुलाला ताप, अंगदुखी होत असल्यामुळे त्याला १९ सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उपचारादरम्यान त्याला डेंग्यू झाल्याचे शुक्रवारी (२३ सप्टेंबर) निदान झाले. तत्पूर्वी या भागातील किमान ते १० नागरिकांना असाच त्रास होत असल्यामुळे पाच दिवसांपूर्वीच संग्रामसिंग राजपूत यांच्यासह काही नागरिकांनी पिंप्राळा परिसरातील महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन तक्रार दिली. त्यांनी परिसरात स्वच्छता करून घेण्याची विनंती प्रभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली. तक्रार देऊन सहा दिवस उलटूनही महापालिकेकडून या परिसरात कोणत्याही प्रकारची साफ-सफाई किंवा अॅबेटिंग केलेे नाही, अशी व्यथा नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली. महापालिकेने त्वरित याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुन्हा अॅबेटिंग करू
^अयोध्यानगरभागात यापूर्वी अॅबेटिंग झाले आहे. नागरिकांनी घरातील पाण्याची भांडी रिकामी करून ठेवली पाहिजे. ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतील, तेथे पुन्हा अॅबेटिंग केले जाईल. डॉ.विकासपाटील, आरोग्याधिकारी, मनपा
बातम्या आणखी आहेत...