आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीला घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवाळीच्या सुट्यांमध्ये बहिणीला मुंबई येथे घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा रविवारी पहाटे वाजेच्या सुमारास शिरसाेलीजवळ रेल्वेतून पडून मृत्यू झाला.

बांभाेरी येथील रिक्षाचालक चंद्रकांत राजू शिरसाळे (वय २५) हा शनिवारी रात्री बहिणीला मुंबई येथून अाणण्यासाठी घरातून निघाला. रविवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास ताे मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसला. शिरसाेलीजवळ दरवाज्यात उभ्या असलेल्या चंद्रकांतचा रेल्वेतून ताेल गेला. त्यामुळे ताे खांब क्रमांक ४१०-१७ ते ४१०-१९ दरम्यान खाली पडला. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती.
चंद्रकांतला रविवारी पहाटे ४.३० वाजता सिव्हिलमध्ये दाखल करण्यात अाले. अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. उपस्टेशन प्रबंधक एस.के.वर्मांच्या माहितीवरून तालुका पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद केली अाहे.