आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गिरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, वाढदिवसासाठी भाेपाळहून अाला हाेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलीचावाढदिवस साजरा करण्यासाठी भोपाळहून जळगावात बहिणीकडे आलेल्या तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सावखेडा शिवारातील नदीपात्रातील डोहात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मात्र, दोघांना वाचवण्यात यश आले.भोपाळ येथील पोल्ट्री व्यावसायिक गोलू ऊर्फ अक्रम मोहंमद मजीद भिस्ती (वय २६) सोमवारी त्याच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी जळगावात बहिणीकडे परिवारासह आला होता.
सोमवारी मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर मंगळवारी तो नातेवाइकांसह सावखेडा शिवारातील आर्यनपार्क येथे फिरण्यासाठी गेला. मंगळवारी सायंकाळी वाजता अक्रमसह नदीम अन्वर भिस्ती (वय १७), सलमान युनूस भिस्ती (वय २२) आणि अफसर अन्वर भिस्ती त्या वेळी पोहोण्यासाठी गिरणा नदीपात्रातील डोहात गेले.मात्र, अफसर याने पोहोण्यासाठी नकार दिला. परंतु, अक्रम, सलमान आणि नदीम हे पाण्यात उतरले. त्यांना पोहोता येत नसल्याने तिघे बुडायला लागले. त्या वेळी काठावर बसलेल्या अफसरने सलमान आणि नदीम यांना हात देऊन बाहेर ओढले. मात्र, तोपर्यंत अक्रम बुडाला होता. अक्रम बुडाल्यानंतर मेहरूण परिसरातील बबलू पिरजादे सलाउद्दीन, मनूर जहागीरदार, असीफ तडवी, शाहबाज पिरजादे यांनी शोध घेतला. तीन तास शोध घेतल्यानंतर रात्री वाजेच्या सुमारास अक्रमचा मृतदेह हाती लागला.