आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाला ट्रकची धडक, एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अजिंठा चौफुली चौकात भरधाव ट्रकने मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ७.३० वाजता घडली. या अपघातात दोन तरूण जखमी झाले होते. त्यातील एका जखमी नासिर शकुर पटेल याचा उपचारादरम्यान सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 
 
सुरेश राघो बाविस्कर (रा.कानळदा) नासिर शकुर पटेल (वय ३०, रा. खडकेचाळ शिवाजीनगर) हे दोघे मालवाहू रिक्षाने (एमएच १९ ७९०१) गुरुवारी सकाळी ७.३० वाजता कृउबात भाजीपाला घेण्यासाठी जात होते. अजिंठा चौफुली येथे पोहचल्यानंतर भुसावळकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (ओआर ०१ टी ८११८) त्यांच्या रिक्षाला धडक दिली. यात सुरेश नासिर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. उपचारा दरम्यान सायंकाळी वाजता नासिरचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...