आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्मेट घालणे बेतले जीवावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हेल्मेट न घातल्याने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता जैन हिल्स समोर झालेल्या अपघातात शिरसाेलीच्या प्रवीण आस्वार या तरुणाला जीव गमवावा लागला. हा तरुण फूलविक्रीसाठी मोटारसायकलीने जळगावकडे येत होता. या अपघातात प्रवीणचा मृत्यू झाला तर दाेन जण गंभीर जखमी झाले आहे.

शिरसोलीचे माजी सरपंच अर्जुन गणपत आस्वार यांचा मोठा मुलगा प्रवीण अर्जुन आस्वार (बारी) ( वय २९) याची शिरसोलीला फुलांची शेती आहे. प्रवीण हा जैन इरिगेशनमध्ये काम करित होता. शुक्रवारी त्याला सुटी असल्याने तो सकाळी ६.३० वाजता हीरो होंडा स्प्लेंडरने (क्रमांक एमएच-१९, एएस-३१८४) फूलविक्रीसाठी शिरसोलीहून गोलाणी मार्केटकडे येत होता.
जैन हिल्सजवळील पीरबाबांच्या दर्ग्यासमोर हरिविठ्ठलनगरातील विजय शांताराम देवकर (वय ३०) आणि प्रल्हाद शिवाजी पाटील (वय ३० दोन्ही जैन इरिगेशनचे कर्मचारी) हीरो होंडा डिलक्सने (क्रमांक एमएच-०५, एआर-५१७६) जळगावहून येत होते. ट्रकला ओव्हरटेक करीत असताना त्यांची माेटारसायकल प्रवीणच्या मोटारसायकलला धडकली. यात प्रवीणच्या डोक्याला, चेह-याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर विजय प्रल्हाद हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्या दोघांनी हेल्मेट घातले होते. तर प्रवीणने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. प्रवीणला दोन मुली आहेत.

नागरिकांनो, हेल्मेट वापरा
हेल्मेटवापरल्याने अपघातात अनेकांना जीव गमवावा लागताे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन गेल्या काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित करून नागरिकांचे प्रबाेधन केले हाेते. तसेच पाेलिस प्रशासनानेदेखील हेल्मेट वापरणा-यांवर कारवाईचा धडाका सुरू केला होता.