आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या घाईत तरुणाने जीव गमावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमधून खाली पडल्याने मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील तरुणाचे दोन्ही पाय कापले जाऊन मृत्यू झाल्याची घटना ममुराबाद जकात नाक्याजवळ शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. या तरुणाने खाली पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ४५ मिनिटे धडपड केली. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणाजवळ दादर-जळगाव एक्स्प्रेसचे तिकीट होते. झोपेमुळे कदाचित त्याला जळगाव रेल्वेस्थानकावर उतरता आले नाही. त्यामुळे तो घाईगर्दीत धावत्या रेल्वेतून उतरत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या वीस दिवसांत रेल्वेतून खाली पडल्याची ही तिसरी घटना अाहे. त्यात दाेघांचा मृत्यू झाला तर एकाला अापला पाया गमावण्याची वेळ अाली अाहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सचिन साहेबराव धनगर (वय २४) हा गीतांजली एक्स्प्रेसमधून ममुराबाद जकात नाक्याजवळील लेंडी नाल्याच्या पुलावर ताे खाली पडला. यामुळे त्याचे दाेन्ही पाय कापले गेले. तो रेल्वे रुळाच्या मधाेमधपडल्याने बाजूला जाऊन जीव वाचवण्यासाठी धडपड करत हाेता. त्या वेळी मनाेज रामदास पवार (रा. चाैघुले प्लाॅट) या तरुणाला सचिन हा रुळाच्या मध्ये पडलेला दिसला. त्याने काही मित्रांसाेबत जाऊन त्याला रुळापासून बाजूला केले. तसेच रुग्णवाहिकेसाठी फाेनही केला. मात्र, एक तासानंतर रुग्णवाहिका अाली. या वेळी रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचरवर टाकत असताना ताे पुन्हा एकदा खाली पडला. जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

रेल्वेखाली शेतमजूर युवकाची आत्महत्या; रेल्वेतून पडून एक जण जखमी
रेल्वेखालीयेऊन शेतमजूर युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र देवराम महाजन (वय ३५, म्हसावद, ता. जळगाव) असे या मृत युवकाचे नाव आहे. म्हसावद-बोरनार परिसरातील रेल्वे खांब क्रमांक ३७४ या अपच्या लाइनवर ही घटना घडली. एमआयडीसीचे पोलिस एच.जी.राठोड यांनी त्यास मृतावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पश्चात पत्नी, मुली, एक भाऊ असा परिवार आहे. तसेच रेल्वेतून पडल्याने युवराज राजाराम मारते (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना भुसावळ रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हजार साड्यांतून एक लाख कापडी पिशव्यांची निर्मिती
करूनहीत्याला अाळा घालण्यात अपेक्षित यश अद्याप अालेले नाही. त्यामुळे उत्पादक विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा वापर करणाऱ्या जनतेची सवय बदलण्यासाठी महापालिका अाॅफिसर क्लबने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला अाहे. अाॅफिसर क्लबच्या सर्व सदस्यांना अावाहन करून त्यांच्याकडून प्रत्येकी दाेन साड्या प्रतिसाडी ५० रुपये घेण्यात येत अाहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून एका साडीतून २० कापडी पिशव्या तयार करण्यात येणार अाहेत. अाराेग्य अधिकारी डाॅ. विकास पाटील यांनी ही संकल्पना अधिकारी, डाॅक्टर अभियंते यांच्याजवळ व्यक्त केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला अाहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी खुद्द दाेन चांगल्या प्रतीच्या साड्या या उपक्रमासाठी दिल्या अाहेत.
२० अाॅगस्ट : इंद्रपस्थनगरातील महेश मधुकर वेरूळकर (वय ४२) हे भुसावळ येथून पटना-पुणे या जळगाव रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाडीत बसले. जळगाव रेल्वे स्थानकावर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केल्याने तोल जाऊन ते रेल्वेखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. २० अाॅगस्टला हा अपघात झाला होता.

२० दिवसातील तिसरी घटना
२४ अाॅगस्ट :
आनंदवनएक्स्प्रेसने नागपूर येथून बसलेल्या विनाेदकुमार कांताप्रसाद द्विवेदी (वय ३०, मध्यप्रदेश)याला भुसावळला उतरायचे हाेते. परंतु झोप लागल्याने भुसावळला उतरता अाल्याने त्याने म्हसावद रेल्वे स्थानकावर गाडी हळू झाल्यावर उडी मारली. परंतु त्याच वेळी त्याचा ताेल गेल्याने डावा पाय चाकाखाली अाल्याने कापला गेला. तसेच डाेक्यालाही गंभीर दुखापत झाली हाेती. २४ अाॅगस्टला सकाळी अपघात झाला होता.

कुटुंबाचा कर्ता गेला
मूळचे धुळे तालुक्यातील बाेरकुंड येथील धनगर कुटुंब पाच वर्षांपूर्वी कामासाठी मेहूणबारे येथे अाले हाेते. ताे माेटारसायकलवर खेडाेपाडी फिरून रेडीमेड कपड्यांची विक्री करून कुटुंबाची उपजीविका चालवत हाेता. शनिवारी जळगाव येथे कपडे खरेदीसाठी जाणार असल्याची माहिती त्याने कुटुंबीयांनी दिली होती. मात्र कुटुंबीयांना सचिनच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. त्या वेळी कुटुंबीयांनी अाक्राेश केला. त्याला दाेन बहिणी असून एक बहीण मेहूणबारे येथेच राहते.

वाहन परवान्यावरून पटली अाेळख
मृत सचिनच्या खिशात सापडलेल्या पाकिटात वाहन चालवण्याचा परवाना हाेता. त्यावरून त्याची अाेळख पटली. त्यानंतर या घटनेबाबत त्याच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. दरम्यान, सचिनच्या खिशात हजार ६३० रुपये अाढळून अाले अाहेत.

दादरहून काढले जळगावचे तिकीट
सचिनच्याखिशात शनिवारी पहाटे वाजेच्या सुमारास दादर रेल्वेस्थानकावरून काढलेले दादर-जळगाव एक्स्प्रेसचे तिकीट हाेते. कदाचित झाेप लागल्याने जळगाव रेल्वेस्थानक निघून गेल्यानंतर जाग अाली असेल. त्यामुळे उतरण्याच्या घाईत ताे खाली पडण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...