आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर बोलता-बोलता तरुण ‘गोलाणी’वरून पडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -मोबाइलवर बोलता-बोलता एक २३ वर्षीय तरुण शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून धाडकन खाली कोसळला. त्याच्या डोके आणि पाठिला जबर दुखापत झाली असून खासगी रुग्णालयात त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मोबाइलवर बोलत असताना अचानक तोल गेला की त्याने उडी मारली? याबाबत मात्र संभ्रम आहे.
रवींद्र भिला पाटील ( वय २३ ) असे या तरुणाचे नाव असून कासमवाडीच्या बुनकरवाड्यातील तो रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास तो गोलाणी मार्केटमधील ‘ई’ विंगमध्ये कामानिमित्त आला होता. मोबाइलवर बोलत जिन्याने खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने खाली कोसळला असे सांगण्यात येते. खाली पडताच पाठीला डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. हे पाहून काही दुकानदार परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने सहयोग क्रिटिकलमध्ये हलवण्यात आले. त्याच्या मोबाइलचे हेडफौन गोलाणीतील वायरवर लटकले होते. त्यामुळे तो कोसळला की त्याने उडी मारली? या बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तो अत्यंत मितभाषी होता. त्याचा मित्रपरिवारही मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. गोलाणीतही त्याला यापूर्वी फारसे पाहिले नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.
तिसरी घटना
गोलाणीमार्केटच्या इमारतीवरून यापूर्वी चहा वाटणारा १५ वर्षांचा मुलगा कोसळला होता. त्यानंतर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शुक्रवारची ही तिसरी घटना आहे.
हलाखीची परिस्थिती : रवींद्रहा गेल्या चार-पाच वर्षांपासून शाहूनगरातील हाउसिंग सोसायटीतील एका क्रिटिकल केअर सेंटरमध्ये कामाला आहे. रवींद्रचे वडील सेंट्रिंगचे काम करतात. त्याला आई लहान भाऊ असून, घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे त्याच्या नातलगांनी सांगितले.